म्हणी व त्यांचा अर्थ
Sayings and their meanings -
This topic is frequently asked in various competitive examinations conducted by the state government. Usually, you will see one or more questions on this topic.most asked in exam मराठी म्हणी
( MPSC, Maharashtra police exam, TET, CTET, Maharashtra Engineering Services Examination, State Services Examination, Clerk Typist Examination, Maharashtra Agricultural Services, Assistant Motor Vehicle Inspector, Sales Tax Inspector Examination, Maharashtra Forest Services, Tax Assistant Examination, etc.)
· साप साप म्हणून भुई थोपटू नये - संकट नसतांना त्याचा आभास निर्माण करणे .
· हाताच्या कंकणाला आरसा कशाला ? - स्पष्ट र असलेल्या गोष्टीला पुरावा नको .
· हत्ती गेला पण शेपुट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला .
· हलवायाच्या घरावर तुळशीपत्र - परस्पर या दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे ; स्वत : ला झीज लागू न देणे जगजात
· हाजीर तो वजीर - जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो .
· हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे - जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशेने हातातले सोडण्याची पाळी येणे .
· हिरा तो हिरा , गार तो गार - गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाही .
· हात फिरे तिथे लक्ष्मी वसे - उद्योगी माणसाच्या कार घरी संपत्ती नांदते .
· हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते - पण आजार संकटे येतात ती लवकर मोठया प्रमाणावर येतात ; पण कमी होतांना हळूहळू कमी होतात .
· हात ओला तर मित्र भला - फायदा असेपर्यंत सगळे गोळा होतात , म्हणजेच तुमच्यापासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात.
· शितावरुन भाताची परिक्षा - वस्त न भाताची परिक्षा - वस्तूच्या लहान भागावरुन त्या संपुर्ण वस्तूची परीक्षा करणे .
· शहाण्याला शब्दाचा मार - शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते .
· शेरास सव्वा शेर - चोरावर मोर , म्हणजेच एकाला दुसरा वरचढ भेटणे .
· शेजी देईल काय आणि मन धायेल काय ? - शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करुन दिला तरी मनाची तृप्ती होऊ शकत नाही .
· सगळेच मुसळ केरात - मुख्य व महत्वाच्या गोष्टीकडेच दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे .
· सरडयांची धाव कुंपणापर्यंतच - प्रत्येकाच्या छाहीर कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते .
· सारा गाव मामाचा एक नाही कामाच - जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे .
No comments:
Post a Comment